चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार

कोथरूड : चंद्रकांत पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठीगेले महिनाभर सुरु असलेला   सोमवारी समाप्त झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येत होता. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान सर्वच स्तरातून चंद्रकांतदादांना व्यापक जनसमर्थन मिळाले.

विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून भाजपा महायुतीने चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले‌. ठिकठिकाणी कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटीगाठी, बाईक रॅली आदींच्या माध्यमातून जोरदार प्रचार झाला. प्रत्येक ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून मंडल स्तरापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ झोकून देऊन काम करत होता.

विविध सोसायट्यांमधील यांच्या संपर्क अभियानात ही अनेक नागरिक चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून विजयासाठी शुभेच्छा देत होते. रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी ‘दादा तू कोथरुड मधून दणक्यात निवडून येणार’ अशा शब्दांत आशीर्वाद दिले. तर सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी ‘दादा तुम्ही मंत्री असूनही आमच्यातलेच वाटता अशी भावना व्यक्त करत आपला पाठिंबा दिला. त्यासोबतच प्रचाराच्या समारोपप्रसंगी कमिन्स कर्मचाऱ्यांनी चंद्रकांतदादांना जास्तीत जास्त मतदान करण्याची कमिटमेंट दिली.

वस्ती भागातूनही चंद्रकांतदादांना उत्स्फूर्त मिळाल्याचे चित्र होते. बाईक रॅलीदरम्यान गणेश मंडळांकडून फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत करण्यात आले. तर अनेक महिलांनी दादांचे आनंदाने औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. यामध्ये चंद्रकांतदादांनी वस्ती भागातील महिलांसाठी पाच वर्षांत केलेल्या कामांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

चंद्रकांतदादांसाठी मुळशीकरांची वज्रमूठ
कोथरूड मतदारसंघात मुळशीकर नागरीक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्याने; तसेच, मुळशीचे सुपूत्र असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्री पदापर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे; त्यासोबतच पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात मुळशी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने मुळशीकरांनी आपली संपूर्ण ताकद दादांच्या पाठिशी उभी करण्याचा निर्धार मुळशीकरांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

ब्राह्मण समाजही चंद्रकांतदादांच्या पाठिशी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजनेही चंद्रकांतदादा पाटील यांच्याच पाठिशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय; प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी आणि चंद्रकांतदादांनी समाजातील विविध शाखांसाठी गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून सढळ हाताने केलेली मदत आदींमुळे कोथरुड मधील ब्राह्मण समाज चंद्रकांतदादांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

टेकडी बचाव कृती समितीचा गैरसमज दूर
बालभारती-पौड रस्तामुळे टेकडीवर जाणारे अनेक नागरिक संभ्रमात होते. त्यामुळे टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांनी ‘वोट फॉर टेकडी’चा नारा दिला होता. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः एआरएआय टेकडीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच, कोर्टाचा निकाल रस्त्याच्या बाजूने असूनही पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याची माहिती दिली. त्यावर टेकडीवर जाणाऱ्या नागरिकांकडून आनंद व्यक्त करत दादांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे १० जून २०२४ रोजीच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील टेकड्यांवर ६५ हजार वृक्ष संवर्धनाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

एकंदरीत चंद्रकांतदादांनी प्रचारा घेतलेली आघाडी; वाढता प्रतिसाद यांसह विविध कारणांमुळे ही निवडणूक चंद्रकांतदादांसाठी एकतर्फी असल्याचे चित्र होते. माध्यमांकडूनही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही चंद्रकांतदादा पाटील हे विक्रमी मतांनी विजयी होतील, असा अंदाज ही व्यक्त करण्यात येत आहे.

See also  बालेवाडीत "जन आशीर्वाद मेळाव्यात"  हजारोंच्या गर्दीसमोर सर्वसामान्यातील पाहुणे; चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बालवडकर यांची नाराजी