पुणे मनपाचे माजी नगरसेवक हरिश्चन्द्र अण्णा दांगट यांचे निधन

पुणे : पुणे महानगर पालिकेचे मा. नगरसेवक हरिश्चन्द्र अण्णा दांगट  यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. अण्णांचा जन्म वडगाव बुद्रुक येथील सर्व सामान्य कुटुंबात झाला होता. शिवसेनेचे वडगाव बुद्रुक शाखाप्रमुख म्हणून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. सिंहगड रोडवरील नागरी समस्या सोडवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी शिवसाई नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली व अनेक छोट्या व्यवसायिकांना कर्ज उपलब्ध करून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. त्यानंतर त्यांनी सिंहगड रोडवरील पहिला राजमाता जिजाऊ सार्वजनिक नवरात्र उत्सव अभिरुची शेजारील महालक्ष्मी मंदिराचे ठिकाणी सुरु केला. या ठिकाणी सिंहगड रोडवरील पहिला सांस्कृतिक महोत्सव त्यांनी सुरु केला.


 1997 साली वडगाव बुद्रुक गावाचा पुणे मनपा मध्ये समावेश झाला. 2002 साली पुणे मनपा ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत हिंगणे, वडगाव व धनकवडी असा प्रभाग होता व या समविष्ट गावाचे पहिले नगरसेवक म्हणून अण्णा निवडून आले होते. नगरसेवक म्हणून या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. या भागाची विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. तसेच त्यांनी बांधकाम व्यवसायात सुद्धा जम बसविला होता. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.


पश्चिम हवेलीतील सर्व सामान्य कार्यकर्त्यांना व गोर गरीब लोकांना त्यांनी कायम आधार दिला आणि प्रोत्साहन दिले. सिंहगड रोड वर भव्य दिव्य असे महालक्ष्मी आणि साईबाबा मंदिर त्यांनी उभे केले. या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे वाढदिवस व इतर शुभकार्य पार पडत आहेत. या भागातील पेपर विक्रेते, मूर्तिकार अशा अनेक लोकांना त्यांनी कायम साथ दिली. नुकताच त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

See also  भाजपच्या आरोग्य शिबीरात १२हजार रुग्णांची मोफत तपासणी