महाराष्ट्रातल्या तथाकथित चाणक्याने आता राजीनामा द्यावाच- मुकुंद किर्दत, आप

पुणे : अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेच्या प्रचारा दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप लावला होता. मोदी हे पुढील वर्षी ७५ वर्षाचे होत असल्यामुळे पक्ष शिस्तीस अनुसरून निवृत्त होतील आणि तत्पूर्वी अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी ते इतरांचा पत्ता साफ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये बाजूला सारल्या जाणाऱ्या नावात त्यांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचाही पत्ता कट केला जाईल असा दावा केला होता, त्याच वेळेस महाराष्ट्रातील देवेंद्र फडवणीस यांचे नाव या पंख छाटलेल्या नेत्यांमध्ये घेतले होते.

महाराष्ट्रामध्ये मतदारांनी भाजपच्या खोके आणि बोके राजकारणाला नाकारले आहे आणि देवेंद फडणवीस यांच्या चाणक्यगिरीला चपराक दिलेली आहे, त्यामुळे वरिष्ठांना केवळ विनंतीचे नाटक न करता खरोखरच त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा, शिवराज सिंह चौहान  या यादीमध्ये आता देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ येणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली असून त्या संदर्भात राजकीय चर्चा चालू आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी हे अमीत शहा यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा अडसर दूर करतील अशी शंका आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही असे विधान भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी केले होते. त्यामुळे या अंतर्गत दुफळी मध्ये काय होणार हे लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

See also  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ