पाषाण बाणेर परिसरातील वाहतूक समस्या बाबत डीवायएसपी यांना बाणेर पाषाण लिंक रोड असोसिएशनच्या वतीने निवेदन

बाणेर : बाणेर बालेवाडी, पाषाण सुस रोड, लिंक रोड परिसरातील वाहतूक समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी बाणेर बालेवाडी लिंक रोड असोसिएशन च्या वतीने डी वाय एस पी हिंमत जाधव यांची बाणेर बालेवाडी पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, भाजपा शहर चिटणीस राहुल कोकाटे, बाणेर बालेवाडी लिंक रोड असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चत्तुर, रवी सिन्हा, पुष्कर कुलकर्णी, जाधव आदी उपस्थित होते.

बाणेर बालेवाडी परिसरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच वाहतुकीबाबत देखील अनेक समस्या असून यावर उपाययोजना करण्याची सातत्याने नागरिक मागणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर वाईन शॉप चालकांना देखील सूचना देण्यात याव्यात. तसेच रस्त्यांवर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  जिल्ह्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरू