पोलिस मित्र संघटना ( महाराष्ट्र राज्य) वतीने  ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानांचे अभिनंदन

पुणे : पोलिस मित्र संघटना ( महाराष्ट्र राज्य) वतीने  ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानांचे अभिनंदन
पाकीस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त करून ऑपरेशन‌ सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सर्व भारतीय जवानांचे शिवाजीनगर चौकात पोलीस मित्र संघटना (महाराष्ट्र राज्य) वतीने   अभिनंदन करुन  जोषपूर्ण  भारत माता की जय , वंदेमातरम्  अशा घोषणा देऊन विजयोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते , मा. महेश बोळकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाचे  खरात ,तसेच संघटनेचे पदाधिकारी मनीष सोनीग्रा ,रणजित कलापूरे ,चैतन्य जगताप यांच्यासह  पोलीस कर्मचारी, पुणेकर नागरीक उप‌स्थित होते.

See also  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी चित्र रंगकाम स्पर्धा आयोजन