पुणे : पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध १९ प्रकल्पांचा आढावा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह घेतला. प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, रस्ते, एचटीएमआर, शहरातील अतिक्रमणे, एसटीपी, प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावातील प्रस्तावित प्रकल्प आदींसंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, अजय खेडेकर, अमोल बालवडकर यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
सामान पाणीपुरवठ्यासह शहरातील मंजूर प्रकल्प कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत, अशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, राज्य शासनाकडे सादर प्रस्तावावर पाठपुरावा करु, असेही आश्वस्त केले. त्यासोबतच प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, अशी ग्वाही यावेळी दिली.
