वाहतूक कोंडीतून आंबेगावला मुक्त करण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू –  खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले भुमिपूजन

आंबेगाव बुद्रुक : नगरसेवकपद ‘असो वा नसो’ स्मिताताई कोंढरे आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत, जनतेच्या हाकेला धावून येणार्या कोंढरे दांपत्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहावे असे अवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

केवळ तीन वर्षांत पंधरा मोठे प्रकल्प आपल्या प्रभागात उभारण्यात यशस्वी ठरल्यामुळे ज्यांना “वेगवान विकासाच्या शिल्पकार” म्हटलं जातं त्या माजी नगरसेविका स्मिताताई सुधीर कोंढरे या आंबेगावला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी झटत आहेत. त्यांच्याच सातत्य पुर्ण पाठपुराव्यामुळे  तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधीर कोंढरे यांच्या सहकार्याने रखडलेल्या महत्वाच्या रस्त्यांची कामांना सुरूवात होत आहे.
१)मनस्वी सोसायटी ते हायवे सर्व्हिस रस्ता हा मुख्य डि. पी. रस्ता
2) चिंतामणी शाळा ते पुणे-मुंबई बायपास रस्ता
३)आगम टेकडीवरील वाघजाई नगर येथील रंगा चौक ते वाघजाई मंदिर रस्ता
४)आंबेगाव बुद्रुक  गावठाणातील मारुती मंदिर ते वेताळबुवा मंदिर
५)आंबेगाव खुर्दमधील मुख्य रस्ता जि. प. शाळा ते बेंगलोर हायवेच्या सर्व्हिस रस्तापर्यंतचा रस्ता अश्या
२ कोटी ५० लाख  रुपयांच्या कामांचे भूमिपूजन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झाले.


आंबेगाव नर्हे मार्गावरील  सिध्दीविनायक मनस्वी सोसायटी येथे पार पडलेल्या मुख्य भुमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जनहित विकास मंचचे संस्थापक सुधीर विनायक कोंढरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सोसायट्यांचे पदाधिकारी, ज्येष्ठ, महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.आभार स्मिताताई कोंढरे यांनी मानले.

See also  निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप