बाणेर येथे “उडान नारीशक्ती रन” यशस्वी: रंगली महिलांच्या उत्साहाची पर्वणी

पुणे : रा. काँ. पा. पुणे जिल्हा शहराध्यक्षा/वामा वुमन्स क्लब अध्यक्षा पूनम विशाल विधाते आयोजित, महिलांच्या आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी आयोजित केलेला “उडान नारीशक्ती रन” उत्साह आणि जल्लोषात यशस्वीपणे पार पडला. सकाळी बाणेर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक येथे झालेल्या या उपक्रमात महिलांचा प्रचंड सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली गेली.


कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील (उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य), माननीय सौ सुनेत्रा ताई पवार (खासदार), माननीय श्री शंकर भाऊ मांडेकर (आमदार, भोर-मुळशी-राजगड मतदारसंघ), माननीय रूपालीताई चाकणकर (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), आणि प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रुती मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.


“उडान नारीशक्ती रन” हा उपक्रम केवळ महिलांच्या आरोग्यासाठीच नाही, तर त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
यावेळी माननीय खासदार सौ सुनेत्रा अजित पवार यांनी आपले विचार मांडताना नमूद केले की, “पहिल्या वर्षी मी या उडान रन ला एक सामान्य नागरिक म्हणून उपस्थित होते, आणि आज दुसऱ्या वर्षी खासदार म्हणून तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. सौ. पूनम विशाल विधाते यांनी महिलांच्या आरोग्य जागृतीसाठी आणि सबलीकरणासाठी सुरू केलेला वामा वुमन्स क्लब तसेच या उपक्रमाअंतर्गत होणारी विविध शिबिरे खरोखरच कौतुकास्पद आहेत.”


या कार्यक्रमात 14,000 महिलांनी विक्रमी सहभाग नोंदवून “उडान नारीशक्ती रन” ला मोठे यश मिळवून दिले. विशेषतः 81 वर्षांच्या आजीबाईंनी आणि सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि एकत्र येऊन उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची संपूर्ण यशस्विता सौ. पूनम विशाल विधाते आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि महिलांनी व्यक्त केलेल्या आनंदाने हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

यावेळी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थितांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ चांदेरे, पुणे महानगरपालिकेचे मा. नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, मा. नगरसेविका सुषमाताई निम्हण, पंचायत समिती मुळशीच्या मा. सभापती सारिकाताई मांडेकर, औंध प्रभाग समितीचे मा. स्वीकृत सदस्य अर्जुन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणपत मुरकुटे पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, महाळुंगे गावचे उपसरपंच युवराज कोळेकर, मा उपसरपंच काळुराम गायकवाड,माजी उपसरपंच अजिंक्य निकाळजे, माजी उपसरपंच पांडुरंग पाडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, पैलवान समीर कोळेकर, योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ननावरे, संजय जी ताम्हाणे ,प्राईड ग्रुपचे सर्वेसर्वा अरविंद जैन, नाईकनवरे डेव्हलपरचे संचालक आनंद नाईकनवरे, उद्योजक विनायक काकडे, नितीनजी खोंड, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष राहुल पारखे, राष्ट्रवादी युवकचे प्रभाग अध्यक्ष शेखर सायकर, उद्योजक प्रणवजी कळमकर, राष्ट्रवादीचे नेते मिलिंद वालवडकर, बालेवाडीचे मा. पोलीस पाटील अशोक कांबळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष निलेश पाडळे ,बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते ,रामदास विधाते ,भगवान विधाते राजेश विधाते ,सुनील विधाते ,गौरव विधाते ,अक्षय विधाते ,तुषार विधाते तसेच बाणेर, बालेवाडी, सूस, माहाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या.

See also  बाणेर मध्ये पाणी पालिकेच्या टाकीतून बाहेर पडतं पण सोसायटीच्या टाकीत सोडलं जातं नाही