पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते “पुणे डेंटल शो”चे उद्घाटन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम महाळुंगे बालेवाडी येथे इंडियन डेंटल असोसिएशन च्या वतीने दोन दिवसीय चर्चासत्र पेपर प्रेझेंटेशन व सायंटिफिक प्रेझेंटेशन एक्सपो तसेच पुणे डेंटल शो चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए ए नातु , डेंटल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर राजीव चुग, सेक्रेटरी डॉक्टर अशोक ढोबळे, डॉक्टर नितीन बर्वे, डॉक्टर अजित कदम तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये भारतातील दंतचिकित्सा संदर्भातील विविध साहित्यांचे प्रदर्शन तसेच डॉक्टरांसाठी आवश्यक असलेल्या स्टाॅल या शिबिरामध्ये लावण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी देशभरातील जवळपास एक हजाराहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.

दातांची निगा राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जगभर मौखिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत,
पुणे येथे अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये दंतवैद्यकिय विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

See also  दत्तनगर बाणेर परिसरात राम नदी लगत संरक्षण भिंत उभारण्याची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुनम विधाते यांची निवेदनाद्वारे मागणी