बाणेर : बाणेरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा कोषाध्यक्ष श्री राम जन्मभूमी अयोध्या श्री गोविंद देव गिरी यांच्या हस्ते पार पडला.
या ठिकाणी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बाणेर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या भूमिपूजन सोहळ्यास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर सावंत, माजी नगरसेवक अमोल बालवडकर,माजी नगरसेविका ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजन समस्त बाणेर ग्रामस्थ व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे उपाध्यक्ष राहुल पारखे, सचिव अनिकेत मुरकुटे, खजिनदार वर्षा राजेश विधाते, प्रवीण विलास शिंदे, मंगेश पुंडलिक मुरकुटे यांनी केले होते. बाणेर ग्रामस्थ व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष रखडलेल्या बाणेर गावठाणातील ऐतिहासिक भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.