डोणजेतील बांधकाम व्यावसाविकाचे  अपहरण करत निघृण हत्या करणाऱ्या मुख्य सुत्रधार आरोपीस केले जेरबंद

खडकवासला: खंडणीसह आलिशान मोटारीसाठी ठेकेदाराचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे घटनेतील मुख्य आरोपीस अटक करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबरच हवेली पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुंड योगेश उर्फ बाबू भामे याला काल रात्री कोल्हापूर येथून अटक केली.
योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय 27 वर्ष राहणार डोणजे ता. हवेली जि पुणे), असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांतील  दोन जणांना अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यातील तिन्ही गुन्हा करून  नाशिक येथून रेल्वेने गोरखपूर बाजूकडे पळुन जात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जबलपूर येथून रेल्वे पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. आरोपी  शुभम पोपट सोनवणे (वय २४ वर्षे, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, ) मिलीद देवीदास थोरात,( वय २४ वर्षे, रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर ) येथुन अटक करण्यात  आले होते. हे दोघेही आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

१४ नोव्हेंबर रोजी सिंहगड पायथा परिसरात बांधकाम ठेकेदार विठ्ठल सखाराम पोळेकर( वय 70 वर्ष ) यांचे अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून मागील दीड महिन्यात मुख्य आरोपी फरार असल्यामुळे हवेली पोलिसांच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.


विठ्ठल सखाराम पोळेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता त्यांचे राहते घरातून सिंहगड किल्ल्याचे दिशेने मॉर्निंग वॉक करीता गेले होते. ते पुन्हा घरी नेहमीचे वेळेत सकाळी साडेसात पर्यंत घरी आले नाही म्हणून हवेली पो स्टे येथे त्यांची मुलगी सोनाली पोळेकर राहणार शुक्रवार पेठ यांनी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मिसींग खबर नोंदविणेत आलेली होती.
विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता, त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश ऊर्फ बाबू किसन भामे याने विठ्ठल पोळेकर यांचेकडे खंडणी म्हणून दोन कोटी रुपये किंवा जॅग्वार कंपनीची चारचाकी अलिशान मोटरकार मागितली होती, त्याची पुर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खून करण्याची धमकी दिली होती.

या गुन्हयातील मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबु  भामे हा गुन्हा घडलेपासून फरार होता. त्याचे शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तैनात करणेत आलेली होती. सदरची पथके सातत्याने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी योगेश भामे हा कोल्हापूर येथे असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत पथकाला मिळाली होती.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पो स्टे चे पोनि सचिन यांगडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सपोनि सागर पवार, पोसई अभिजीत सावंत, पोसई संजय सुतनासे, अंमलदार रामदास बाबर, राजू मोमोण, अतुल डेरे, अभिजीत एकशिंगे, मंगेश बिगळे, अमोल शेडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, महेश बनकर, हनुमंत पासलकर, तुषार भोईटे, सागर नामदास, वैभव सावंत, विभीषण सस्तुरे, हवेली पो स्टेचे अंमलदार संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड, अजय पाटसकर, दिलीप आंबेकर यांनी केली आहे. पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.

See also  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण वारीदरम्यान "महाआरोग्य शिबिराचे" आयोजन