पुणे : मणिपूर लोकसभेचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोईजम यांनी आज काँग्रेस भवनला भेट दिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा तिरंगी मफलर, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोईजम यांनी उपस्थितांसाठी मार्गदर्शनपर भाषण केले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी काँग्रेस भवन विषयी माहिती सांगितली.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, राजू ठोंबरे, सुजित यादव, विशाल जाधव, अक्षय माने, रविंद्र माझीरे, गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, सतीश पवार, राज अंबिके, संदिप मोकाटे, प्राची दुधाणे, सीमा सावंत, सुरेश नांगरे, ज्योती परदेशी, सुंदरा ओव्हाळ, लतेंद्र भिंगारे, समीर शेख, प्रकाश पवार, देवीदास लोणकर, वैभव डांगमाळी, फैयाज शेख, प्रदिप परदेशी, रवि पाटोळे, नुर शेख, रमाकांत साठे, सचिन दुर्गोडे आदी उपस्थित होते.