विठ्ठलराव शिवरकर विद्यालयामध्ये मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न

वानवडी, पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भैरोबानाला, वानवडी, पुणे १ व रौंदाळे पॅथॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गेल्या 6 वर्षांपासून वानवडी येथे कार्यरत असलेल्या रौंदाळे पॅथॉलॉजी सर्व्हिसेसचे संचालक विनायक रौंदाळे, ओमकार रौंदाळे, व प्रियांका रौंदाळे यांनी विद्यालयातील एकूण ६५० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी केली.


विद्यार्थ्यांना भविष्यात अचानक काही वैद्यकीय आवश्यकता निर्माण झाली तर विद्यार्थ्यांना स्वतःचा रक्तगट माहित असावा, हा यामागील उद्देश आहे. शासनाच्या युडायस प्लस अंतर्गत विद्यार्थी माहिती तपशिलामध्ये विद्यार्थी शालेय माहिती सोबत रक्तगटाची माहिती अद्यावत असणे आवश्यक असल्याने तातडीने या शिबिराचे आयोजन करणे आवश्यक होते. विद्यालयातील ९०% विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातून येत असल्याने हे शिबीर मोफत घेण्यात आले.


याप्रसंगी विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व सचिव चंद्रकांत ससाणे सर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल विनायक रौंदाळे व परिवाराचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांनी आभार व्यक्त केले. रक्तगट तपासणी नंतर विद्यार्थ्यांना पौष्टिक लाडूचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यालयातील गोरक्षनाथ केंदळे, मचीन्द्र रकटे, अरविंद शेंडगे, घनश्याम पाटील, युवराज देशमुख, वहिदा अवटी, श्रद्धा ससाणे, दीपा व्यवहारे, आशा भोसले, दिपाली जाधव, उज्वला पगारे, संगीता भुजबळ, नलिनी गायकवाड, कल्पना पैठणे आदी शिक्षकवृंद व कैलास वाडकर, विवेक कांबळे, अभिषेक शिवरकर, लोखंडे नानी आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण