चिंचवड : उद्योगनगरी म्हणून मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांच्या कर्तृत्वाला सलाम आणि कार्याचा सन्मान करण्यासाठी ‘ हेल्प इन डीएनए ‘ या घोषवाक्यासह, दिला जाणारा रिवा फाऊंडेशनचा ‘ रिवा उत्कृष्ट उद्योजक व उद्योजिका पुरस्कार ‘ व ‘ रिवा मिसेस महाराष्ट् ‘ बीग फॅशन शो व स्पर्धा मोठ्या दिमाखात व रंगारंग वातावरणात राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, फॅशन, व्यापार व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झाला.
उद्योग आणि उद्योजक यांना प्रेरणा देणारा, यशस्वितांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून नव उद्योजकांना दिशा देणारा, रिवा फाऊंडेशन चा ” रिवा उत्कृष्ट उद्योजक – उद्योजिका पुरस्कार ” यंदा कोणास मिळणार तसेच फॅशन शो मध्ये कोण बाजी मारून जाणार याची उत्सुकता व आतुरता यावेळी नामांकीत उद्योजकांसह उपस्थितांना खिळवून ठेवली होती. गणेश वंदने नंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मंगलमय वातावरणात सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक करताना फाउंडेशन च्या अध्यक्षा वर्षा सोनार यांनी रिवा फाऊंडेशन चे कार्य व उद्देशांची माहिती देउन महिलांच्या सर्वांगीण
उन्नतीसाठी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे सांगून मोठ्या संख्येत उपस्थित राहिल्याबद्दल महिलांप्रती आदर व्यक्त केला.
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बीजेपी सत्तारूढ नेते नामदेव ढाके , माजी महापौर अपर्णा डोके, इनफ्लक्स ग्रुप चे डायरेक्टर शिवाजी चमकीरे,पैलवान विजय गावडे , डाॅक्टर अश्विनी पटेल , पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर सह अभियंता व महाव्यस्थापक पिं.चिं.स्मार्ट सिटी मनोज सेठीया, उद्योजक मधुकर बच्चे, सुरज माने, शितल कदम,योगेश पवार, यांचा सत्कार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
यावेळेस उद्योजक शिवम असोसिएट ग्रुप, क्षमा धुमाळ, हनुमंत जाधव, सविता एस.के., दिपक सोनार, बोराडे एन्टर प्राईसेस,एस एस सावंत,शिवाजी जाधव,अर्णव असोसिएट, रश्मी सोनार, संतोष कोल्हे, राखी झोपे, जयंत हीरे, संजय जोशी, कोयल पोनिकर, प्रकाश नेवसे, नुपुर क्षिरसागर, शिल्पा बोरगे, दिपाली ढमाळ, गुरूराज मनुर, सुरेश चिंत्राश, गणेश शिंदे,अॅड तेजस चौरे,गुरु वेलनेस,वेणूप्रसाद सरोदे, यशवंत हरेर,प्रकाश नेवसे,राजेंद्र पेठे,सुकदेव आलदर,अपर्णा वैद्य, डॉ रजनी चौधरी यांचा ‘ रिवा उत्कृष्ट उद्योजक व उद्योजिका पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान रिवा बिग फॅशन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पहायला मिळाली.
विविध फॅशन राउंड वेळी स्पर्धकांच्या अदाकारीने उपस्थित महिला प्रेक्षकांनी सभागृह शिट्ट्या व टाळ्यांनी दणाणून सोडले.
प्रत्येक स्पर्धकांस उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देत भरभरून दाद दिली. ज्युरींनी विचारलेल्या तिरकस प्रश्नांवर फॅशन शो मधील स्पर्धकांनी तितक्याच ताकदीने उत्तरे देऊन, स्वताची ओळख चारोळ्यांमधुन करून देत उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये कुणी गृहिणी, कुणी डाॅक्टर, कुणी अभिनेत्री, कुणी शिक्षिका, तर कुणी प्रोफेशनल्स सहभागी झाल्या होत्या. नोकरी, व्यवसाय, घरसंसार सांभाळून स्वतःची हौस म्हणून फॅशन शो मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना उपस्थित प्रेक्षकांमधून जोरदार प्रतिसाद मिळत होता.
वैभव डान्स अकॅडमी च्या कलाकारांनी बहारदार नृत्य सादर करून सोहळ्यात रंगत आणली. सर्वांची उत्सुकता शिगेला असतानाच रिवा मिसेस महाराष्ट्र विजेती ठरली …..तर
प्रथम रनर अप च्या विजेत्या अश्विनी तिकोने तर
सेकंड रनर अप च्या मानकरी पुष्पलता पाटील ह्या घोषित केल्या…
यावेळेस इतर पुरस्कारावर
बेस्ट रॅम्पवाॅक विजेती ….वैभवी विजय कुमठेकर
बेस्ट पर्सनॅलिटी विजेती …राहेल खाबडे
बेस्ट कोस्टम -मिसेस विजयां देशमुख
बेस्ट स्टाइल विजेती… पुष्पलता पाटील.
बेस्ट अटीट्युड -मौसमी यादव
बेस्ट फोटोजेनिक -डॉ ईवा मोरे
बेस्ट काॅन्फिडन्स विजेती..मंजिरी संदीप राऊत
बेस्ट टॅलेंटेड ॲवॉर्ड – माधवी सोनार
बेस्ट शायनिंग स्टार विजेती – कांचन नितनवरे
बेस्ट ग्रेसफुल विजेती -शिल्पा उपलांची
बेस्ट फोटोजेनिक विजेती…..,डाँ इवा मोरे
बेस्ट ग्रेसफुल विजेती…. शिल्पा उपलांची.,
मिसेस ब्युटीफुल विजेती हेमलता कुलदीप खंडारे
.यांनी आपली मोहोर उमटवली.
सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून फॅशन विश्वातील अनुभवी दिपाली खमाज, नुपुरा क्षिरसागर यांनी काम पाहिले. तर स्पर्धकांना विविध प्रकारच्या स्टेप्स साठी कोरिओग्राफीचे सेशन सविता एस. कें. यांनी प्रशिक्षण दिले. गणेश रणदिवे यांनी आपल्या कौशल्याने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर सोहळा यशस्वी होण्यासाठी चित्रपट दिग्दर्शक प्रशांत जाधवर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रेक्षागृहात उपस्थित प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्या आशा तिकोणे या प्रेक्षकांस आकर्षक बक्षिस देण्यात आले. यावेळेस रिवा फाऊंडेशनच्या वंदना कोल्हापूरे, साधना दातीर, हेमा गाडे, अश्विनी पटेल, अशोक बोराडे, पत्रकार प्रितम शहा व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते व आभार प्रदर्शन विठ्ठल सोनार व सौ साधना दातीर यांनी केले.