औंध : आंकुरा ९ एम हॉस्पिटल, औंध यांच्या मार्फत गरोदर जोडप्यांसाठी मॉमिज डे आऊट नावाचा नावीन्यपूर्ण जस की आधुनिक काळातील डोहाळे जेवण अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी शहरभरातून १५० पेक्षा जास्त जोडप्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम ऑर्किड हॉटेल बालेवाडी येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमात गरोदर महिलांचा बाळंतपणाचा प्रवास सुखकर जाण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते.
त्यात वैद्यकीय क्षेत्रातील शहरातील नामवतांचे मार्गदर्शन झाले.
त्यामधे डॉ उमेश वैद्य ( नवजात बालकांचे तज्ञ), डॉ सुप्रिया पुराणिक ( स्त्रीरोग तज्ञ आणि टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ), डॉ मधुलिका सिंग (स्त्रीरोग तज्ञ), डॉ प्रसाद कुलट ( स्त्रीरोग तज्ञ) , डॉ सिद्धार्थ मादाभुशी ह्या सर्व आंकुरा हॉस्पिटल शी निगडित असणाऱ्या तज्ञाचा सहभाग होता.
महिलांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमात झुंबा डान्स, गिटार शो, नेल आर्ट, मेहंदी आर्ट, फॅशन शो , स्टँड अप कॉमेडियन, ३६० डिग्री फोटो बुथ अशा प्रकारच्या एक ना अनेक मजेशीर गोष्टींचा सहभाग होता. गरोदर जोडप्यांनी ह्या उपक्रमाचा भरपुर आनंद लुटला.