म्हाळुंगे : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय महाळुंगे, (पुणे) येथे त्रिमूर्ती महाशिवजयंतीच्या निमित्ताने शोभायात्रा महाळुंगे गावांमध्ये काढण्यात आली.
या शोभायात्रेमध्ये शिव ,शंकर, पार्वती , त्याचबरोबर मातांच्या डोक्यावर कलश सकारात्मक विचाराचे स्लोगन हातात घेऊन ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय चा झेंडा हातात घेऊन ही रॅली पूर्ण महाळुंगे गावामध्ये काढण्यात आली. शिव मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर ,तळजाई मंदिर, शितलादेवी मंदिर त्याचबरोबर सूर्यमुखी गणेश मंदिर अशा मुख्य महामार्गावरून रॅली काढण्यात आली.
ह्या रॅली द्वारे अनेक शिवभक्तांना शिव परमात्म्याचा संदेश दिला त्याच बरोबर जनजागृतीसाठी अंधकारापासून श्रेष्ठ विचाराकडे जाण्यासाठी अशी सुंदर नाऱ्यांची घोषणा दिली त्यामध्ये वाईट गोष्टींचा त्याग केला तर आपल्या मध्ये श्रेष्ठ आचार येणार विकारांचा दान द्या तर भ्रष्टाचार मुक्त होणार अशा अनेक नाऱ्याद्वारे जनजागृती ह्या रॅली द्वारे करण्यात आली. पूर्ण ब्रह्मकुमार भाई बहिणी एकत्रित होऊन बुराईन पासून व्यसनांपासून मुक्त होण्याचा संकल्प देऊन चरित्र संपन्न जीवन बनवण्याची प्रतिज्ञा करून घेतली.
महाआरती गणेश आणि शंकराचीच करून आणि सर्वांना प्रसाद देऊन ह्य रॅलीच ब्रह्मकुमारी महाळुंगे सेंटर मध्ये समाप्ती केली.
ह्या रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाळुंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते सोपान दादा पाडळे यांच्याद्वारे ह्या रॅलीची ओपनिंग केले.
ह्या रॅलीमध्ये सहभागी ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या बंधू -भगिनी आणि त्याचबरोबर इक्वील लाईफ सोसायटी भजनी मंडळ ग्रुप सुद्धा सहभागी झाले होते. मोठ्या उमंग उत्साहाने शिवरात्रीच्या निमित्ताने ही रॅली महाळुंगे गावांमध्ये काढण्यात आले ब्रह्मकुमारी विद्यालय द्वारे. महाळुंगे सेंटरच्या संचालिका सारिका दीदी यांच्या मार्गदर्शनातून ही रॅली काढण्यात आली. ह्या रॅलीमध्ये बावधन सेंटरच्या संचालिका मंगल दीदी, राजश्री दीदी सहभाग घेतला.