पुणे : ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन महिन्यांचे प्रशिक्षण सत्र पुणे ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाची संकल्पना मा. सचिव श्री मालोजीराजे छत्रपती ( ए.आय.एस.एस.एम.एस. सोसायटी) यांनी मांडली असून ,प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमने , डॉ. दीपक निघोट (विभाग प्रमुख, प्रथम वर्ष अभियांत्रिकी), श्री. अभिजीत भोसले (उपाध्यक्ष, जिमखाना) आणि डॉ. मनीषा कोंढरे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व अशुतोष शिंदे करीत असून, प्रमुख प्रशिक्षक म्हणून लतेन्द्र भिंगारे मार्गदर्शन करणार आहेत.
८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने या विशेष उपक्रमाला सुरुवात होणार असून, विद्यार्थिनींना आत्मरक्षणाची मूलभूत कौशल्ये आणि धोका ओळखण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणासोबतच आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसिक बळकटीकरणावरही भर दिला जाणार आहे.
घर ताज्या बातम्या महिला दिनानिमित्त ए.आय.एस.एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण सत्र