पत्रकार कृष्णकांत कोबल यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार

हडपसर : ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने “ध्येयतरंग’ कार्यक्रमांतर्गत सकाळचे पत्रकार कृष्णकांत कोबल यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, योजना संचालनालयचे संचालक डॉ. महेश पालकर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भंगे, ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे, सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक - प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह