बावधन येथे  गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना अधिकाऱ्यांचे तक्रार करूनही दुर्लक्ष, मनसेची कारवाईची मागणी

बावधन :  रामनगर, बावधन येथील यंत्रगीत व सानिया सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले अनेक दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे हे पाणी वारंवार रस्त्यावर तुंबून शेवाळ निर्माण झाले आहे. शेवाळ झाल्याने रास्ता निसरडा झाला आहे. दुचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.  खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, रहिवाश्यांना चालणेही कसरीतीचे झाले आहे.


क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगूनही संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने परिसरातील अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात मनसे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी  शुक्रवार दि २१/३/२०२५ रोजी श्री परदेशी ९६८९९३८२५४ यांना कळविले होते. त्यांनी लगेच करतो असे सांगितले परंतु आजतागायत तेथे काम चालू झाले नाही.


उन्हाळ्याचे दिवस असताना नागरिक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत परंतु पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.  नागरिकांच्या जीवाशी न खेळता हे पाणी वाया जायचे थांबवावे जर येत्या ४८ तासामध्ये पाणी लाईन दुरुस्त झाली नाही तर होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल याची आपण नोंद घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन  महापालिका सहाय्यक आयुक्त, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय यांना प्रत्यक्ष भेटून मनसेच्या वतीने देण्यात आले.  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभाग अध्यक्ष सुभाष आमले, किशोर इंगवले व मनसैनिक उपस्थित होत. 

See also  उन्नत भारत अभियान प्रादेशिक केंद्र, महाराष्ट्र राज्य, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्र आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने "जल आराखडा निर्माण" प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन