वसुंधरा अभियान कडून कडुलिंबाचे झाड लावून गुढीपाडवा नववर्षाचे स्वागत

बाणेर : तुकाई टेकडीवर बाणेर येथे  वसुंधरा अभियान कडून कडूनिंबाचे झाड लावून गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला व नववर्षाचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याला एक कडूलिंबाचे झाड लावून नववर्षाचे स्वागत केले जाते.


समाजातील वेगवेगळ्या घटकांना घेऊन वसुंधरा अभियान मार्फत वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य चालते. शालेय विद्यार्थ्यांपासून 80-90 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत लोक या कार्यात सहभागी होत असतात. देशी आणि स्थानिक प्रगतींच्या बिया जमा करून त्यापासून रोपे तयार करणे, सर्व देशी प्रजातीच्या झाडांची लागवड,  तसेच पशुपक्ष्यांसाठी पाणवठे , झाडांचे विविध प्रकल्प तयार करून पर्यावरण अभ्यास करणाऱ्यांसाठी साडेचारशे पेक्षा अधिक प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. पुण्यामधील सिमेंटच्या जंगलात बाणेर येथील तुकाई टेकडीवर एक चांगले जैवविविधता युक्त जंगल उभे राहत आहे. गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्ताने वसुंधरा अभियान कडून प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक तरी झाड लावा व त्याचा सांभाळ करा असे आवाहन केले आहे.


बाणेर येथील तूकाई टेकडीवर वसुंधरा अभियान संस्थेंने आत्तापर्यंत 50 हजार झाडे लागवड केली असून, महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

See also  कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन