बालेवाडीतील कुणाल अस्पायरी सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे :  बालेवाडी येथील कुणाल अस्पायरी सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

यावेळी शिवाजी महाराजांचा पाळणा, पालखी शोभायात्रा, सोसायटीचे ढोल पथक तसेच लहान मुलांचे लेझीम पथक यांनी वातावरणात जल्लोष निर्माण केला. विशेष म्हणजे यंदा सोसायटीतील महिलांच्या लेझीम पथकाने प्रथमच सहभाग नोंदवत उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.
तसेच अनुराधा एडके यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या लाठी-काठी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे डोळे दिपवले. या देखण्या सादरीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

बालेवाडी परिसरात शिवजयंती इतक्या उत्साहात आणि परंपरेने साजरी करणारी ही एकमेव सोसायटी असल्याची माहिती सोसायटी सदस्या सौ. शुभांगी सावंत यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

See also  औंध परिसरात बिबट्याचा वावर