औंध मध्ये सिद्धार्थ नगर परिसरातील रस्त्याच्या कामाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन; विकास कामासाठी सौरभ कुंडलिक यांचा पुढाकार

औंध : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विकास निधी अंतर्गत औंध मधील प्रिझम सोसायटी ते जुनं सिद्धार्थनगर रस्ताचे डांबरीकरण करण्यासाठी 20 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन प्रिसम सोसायटी इथे संपन्न झाले.

या कामासाठी विशेष प्रयत्न भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांनी केले.कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, सुनील पांडे, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, आनंद छाजेड, प्रिसम सोसायटी चेअरमन सुधीर जैन, रोहन निलय सोसायटी चे चेअरमन सुनील शिवतारे, सुभाष अगरवाल,सुधीर येवला, जॉय हिंगोरांणी,चेतन मुठे, जया शिवतारे, निर्मला अय्यर,माया शेटे, डॉ.शिल्पा नेमाडे, चेतना खिवंसारा, सुधीर धर्माधिकारी,प्रशांत बन्सल,सागर परदेशी, सचिन मानवतकर, सुप्रीम चोंढे, शशिकांत नाईक, अविनाश लोंढे, आकाश ढोणे उपस्तिथ होते.

यावेळी आमदार शिरोळे यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या भरगोस मतदानबद्दल नागरिकांचे आभार मानले व  या पुढील काळात औंध भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे करणार असल्याचे सांगितले.यावेळी औंध स्पायसर परिसर मधील सोसायटी चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  औंध येथे 370 गडदुर्ग व क्रांतिकारक देशभक्त व धर्म स्थळावरील मातीच्या कलशाचे पूजन