पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासातर्फे दक्षिण पुण्यातील उपनगरात या वर्षीही परीक्षण

धनकवडी : पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासा तर्फे दक्षिण पुणे उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कक्ष उभारण्यात आला.


कात्रज,धनकवडी, भारती विद्यापीठ, बालाजीनगर परिसरातील आकर्षक देखाव्यांचे मंडळ या मार्गाने विसर्जन मिरवणूक काढत असत त्याची दखल घेऊन विघ्नहर्ता न्यासा तर्फे गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. पुणे पोलिस व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने या मंडळाचे परीक्षण करण्यासाठी समन्वयक गिरीश घोरपडे आणि नंदकुमार बोळे त्याचबरोबर परीक्षक डॉक्टर दिनेश बाउसकर,देवयानी वैदानकर, प्रमोद बनसोडे, विनोदकुमार बंगाळे, आशिष जराड, समता शिंदे ,ॲड.दिलीप जगताप,विजय नलवडे,पंकज मेसवानिया,मिलिंद उजगरे,यांनी परीक्षण केले.


दक्षिण उपनगरात चालू केलेल्या परिक्षणाने अनेक गणेश मंडळांनी या निर्णयाचे स्वागत केले. या भागातील अनेक गणेश मंडळे पुढील वर्षी शहरातील मार्गावर न जाता उपनगरामध्ये सहभागी होतील, त्यामुळे पुणे शहरातील मिरवणुकीवर होणारा ताण नक्कीच कमी होईल.भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड आणि सर्व पोलिस कर्मचारी त्याचबरोबर कात्रज दूध संघाचे बहुमूल्य सहकार्य केले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाचे सर्व विश्वस्त यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

See also  एप्रिल महिन्यात १५ दिवस बँकांना असतील सुट्या.