शिवकालीन युद्ध कला दानपट्टा सादरीकरणाने ‘शिवतीर्थ फाऊंडेशन’ची छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कोथरूड : कोथरुड परिसरातील शिवतीर्थनगर मध्ये  छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिवतीर्थ फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, शिवकालीन शस्त्रे,शिवकालीन युद्ध कला, दानपट्टा इत्यादी आयोजित कार्यक्रमामुळे उपस्थिती जनसमुदायास प्रेरक उर्जा मिळाली. कोथरूड परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला वेगळ्या प्रकारची उंची मिळाली.

आपल्या मातृभूमीला जाज्वल्य इतिहास असला तरी नव्या पिढीला या पारंपारिक युद्धकलेची माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते; परंतु सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांनी दिलेल्या भक्कम साथीमुळे एक मोठी उर्जा मिळाली असल्याचे आयोजक शिवतीर्थ फाऊंडेशन चे संस्थापक आणि मनसे शाखाध्यक्ष किरण उभे यांनी सांगितले.

आयोजन समितीत मंगेश कानगुडे, अनंता उभे, सुशांत आंबेकर, सौरभ पवार, संदेश जोरी, अमित मोहोळ, गौरव कंधारे, विकास मोहोळ, साहिल उभे , प्रथमेश तोंडे , धीरज गावडे, अभिजित खोपटकर, लकी मराडे, प्रथमेश उभे, रोहित लोखंडे , मयूरेश चव्हाण प्रशंसनीय काम केले.

See also  महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी