महामार्गावरील पी एम पी एल बस मार्ग व बस थांबा सुतारवाडी सर्विस रस्त्यावरून करावा

सुतारवाडी : कात्रज बस डेपो मधुन सुटणार्‍या पी एम पी एल च्या बस सेवा निगडी हिंजवडी या मार्गे येणाऱ्या बस सुतारवाडी गावातून न जाता राष्ट्रीय महामार्गावरूनच पुढे जात आहे. यामुळे सुतारवाडी पाषाण परिसरातील प्रवासी नागरिकांना या गोष्टीचा नाहक त्रास होत आहे. सदर बस थांबा सोयीचा नसून त्या ठिकाणी पायी जाण्यासाठी सोय नाही व रात्री अपरात्री अपघातही घडतात. सदर बस सेवा सुतारवाडी गावातील सर्विस रस्त्या चा वापर करून पुढे कात्रज बस डेपो ला जाव्या यामुळे स्थानिक प्रवासी नागरिकांना सोयीचे होईल यासंदर्भात माजी नगरसेवक शिवसेना नेते वसंत मोरे यांची भेट घेऊन सुतारवाडी मधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

यावेळी वसंत मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुतारवाडी गावातून सोयीची अशी बस सेवा व उपयुक्त असा बस थांबा करावा अशा विनंती वजा सूचना दिल्या. यावेळी शिवसेना शिवदूत महेश सुतार, शाखाप्रमुख अमोल दादा फाले व शाखा संघटक सुरज चोरमुले यांनी सुतारवाडी गावा तर्फे निवेदन देऊन बाजू मांडली.

See also  निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध