पाषाण मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मालपाणी इस्टेट चा पाषाण   M Soul Strings  हा प्रकल्प कायदेशीर बाबींच्या मुळे अडचणीत सापडण्याची शक्यता

पाषाण : पाषाण मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मालपाणी इस्टेट चा पाषाण मधील सर्वे नंबर १३०/२, १३०/३, १३०/४, १३०/५ मधील  M Soul Strings  हा प्रकल्प कायदेशीर बाबींच्या मुळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बाणेर पाषाण लिंक रोड परिसरामध्ये मालपाणी इस्टेट च्या वतीने भव्य गृह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तानाजी रामचंद्र निम्हण यांच्या वडिलोपार्जित वहिवाटीची जागा त्यांची परवानगी न घेता घेण्यात आली असल्याचे तानाजी निम्हण यांनी प्रकल्प बाहेर लावलेल्या कायदेशीर नोटीसीमध्ये म्हणले आहे.

मालपाणी इस्टेटच्या M Soul Strings या गृह प्रकल्पासाठी  पुणे महानगर पालिकेला बनावट दस्ताच्या आधारे तानाजी रामचंद्र निम्हण यांची परवानगी न घेता मालपाणी व इतर काही जणांनी पालिकेची बांधकाम परवानगी मिळवली याबाबत निम्हण यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पुणे येथे धाव घेतली असून याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

एस सी एन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही तानाजी निम्हण, सोनिग्रा व माजी मंत्री कै. चंद्रकांत छाजेड यांचे पुत्र आनंद छाजेड यांची भागीदारीतील बांधकाम कंपनी 2005 साली करण्यात आली होती. या कंपनी स्थापन करताना घालण्यात आलेल्या अटी शर्ती यांचे पालन न करतात तानाजी निम्हण यांची वडिलोपार्जित जागा त्यांची परवानगी न घेता व मोबदला न देता मालपाणी इस्टेटला देण्यात आली. वडिलोपार्जित जागा देण्याचे अधिकार नसताना कायदेशीर बाबींचे संगनमताने उल्लंघन करत तानाजी निम्हण यांची  मोठे आर्थिक फसवणूक झाली असल्याची बाब समोर आल्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे मालपाणी इस्टेटचा बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरील M Soul Strings बांधकाम प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

See also  शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांच्या वतीने शंकर मांडेकर यांचा सन्मान