स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ
१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवार १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी ८.३५ पूर्वी किंवा ९.३५ नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी ८ वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

See also  पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश