औंध येथील मुख्य पाणीपुरवठ्याची लाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

औंध : परिहार चौकातून औंध कडे जाणारी पाण्याची लाईन मुख्य जलवाहिनीला जोडण्यात आल्याने औंध गावठाणा सह नागरस रोड परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी जोडण्यात आलेली पाण्याची लाईन लिकेज असल्याने दुरुस्त करण्याचे काम देखील करण्यात आले.

चतुर्श्रुंगी पाण्याच्या टाकी वरून येणारी पाणीपुरवठ्याची 600 मिलिमीटर व्यासाच्या लाईन मध्ये 450 मिलिमीटर पिण्याची पाईपलाईन जोडण्यात आल्याने. यामुळे औंध गावठाण,  नागरस रस्ता, वेस्टर्न मॉल मागील सोसायटी आधी परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

नवीन टाकण्यात आलेली लाईन मध्ये औंध उद्यानाजवळ गळती होत असल्याने होऊन देतील सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे औंध मधील गेले अनेक महिने रखडलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

See also  “ पंन्नास खोक्यावाल्यांचे सरकार आता शंभर खोक्याची तयारी करत आहे”. मल्लिकार्जुन खर्गेंचे अस्सल मराठीतून महायुतीच्या सरकारवर टीकास्त्र.