मंत्रीमंडळ उपसमिती नेमा – अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

पुणे : मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा या समूहाचे आरक्षण शैक्षणिक प्रवेश, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, कर्ज व्याज परतावा अनुदानात होणारा विलंब , वेळेत निर्वाह भत्ता न मिळणे, जात प्रमाणपत्र व पडताळणी मधील विलंब , नॉन क्रिमीलेअर इ विविध प्रकारचे दाखले इ. संदर्भाने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यासाठी खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांना भेटून निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

यावेळी आमदार भीमराव तापकीर ह्यांना आपण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकारी विधानसभा सदस्य यांना मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यासाठी विनंती करावी आणि सध्याचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ उपस्थिती नेमली नसल्याने आत्ता मराठा आरक्षण केस कडे कोणाचेही  गांभीर्याने लक्ष नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे अशी भावना पुणे शहर कार्याध्यक्ष अमर पवार ह्यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नाना निवंगुणे, युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, अमोल आहेर, सुभाष यादव इ पदाधिकारी उपस्थित होते.

See also  माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर