कोथरूड : जयदीप मंडळ कर्वेरोड येथील श्री गणरायाची मयुरेश रथातून आगमन मिरवणूक काढण्यात आले. अश्वमेध पथक व सुरभी ब्रास बॅड सह कोथरूड मधील लवकर प्रतिष्ठापना करण्यात आली.
जयदीप मंडळाचे हे 56 वे वर्ष असून मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाईचा देखावा करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरज नलावडे, उपाध्यक्ष शंतनू भुवड, सौरभ पवार, सेक्रेटरी आर्यन चव्हाण, ओम शिंदे प्रशांत नलावडे आहे. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.