औंध : औंध परिसरातील विधाते वस्ती व दर्शन पार्क परिसरामध्ये चार चाकी गाडी व रिक्षा कोयत्याने फोडल्या पोलीस यंत्रणेला आव्हान देत दिवसा गाड्या फोडून ‘इथले भाई आम्हीच’ अशी वल्गना यावेळी दुचाकी वरून आलेल्या खाल्लेखोरांनी केली.
औंध परिसरात दहशत माजवण्यासाठी व्यापाऱ्यांवरील हल्ले व वस्ती परिसरातील गाड्या फोडण्याचे सत्र सुरू आहे. हल्लेखोरंपुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरत असून सहा महिन्यांमध्ये सहा ते सात वेळा गाड्या फोडण्याचे तसेच भांडणे करून हल्ला करण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत.
यामुळे औंध परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोरांवर फर्स्ट कारवाई केली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलीस यंत्रणांना औंध परिसरात सातत्याने चॅलेंज दिले जात असून कारवाईनंतरही गाड्या फोडण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. कायदा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पुणे पोलीस आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत. विधाते वस्ती परिसरातील ग्रीन वूड्स सोसायटीच्या लेनमध्ये पंधरा दिवसाच्या फरकाने दोन वेळा गाड्या फोडण्याचे प्रकार घडले आहेत.
























