अमर टेक पार्क बालेवाडी येथे विजेचा करंट लागून झालेल्या मृत्यूची चौकशी करून गुन्हा दाखल करा

बालेवाडी : बालेवाडी येथील अमर टेक पार्क समोर विजेचा करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.हा मृत्यू प्रशासकीय अनास्थेमुळे झाला आहे. परंतु सदर ठिकाणी झालेल्या अपघातानंतर कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही पुणे मनपाचे विद्युत,स्मार्ट सिटी,महामेट्रो, महावितरण या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकीमुळे या महिलेस आपला जीव गमवावा लागला आहे.

प्रथमदर्शनी असे दिसते की मेट्रोने त्यांच्या कामामुळे त्या ठिकाणी असलेला स्मार्ट सिटीचा विद्युत खांब कोणालाही न सांगता काढण्यात आला.त्या विद्युत खांबाला विद्युत पुरवठा करणारी केबल बंद करण्यात आली नाही.त्यामुळे हा अपघात झाला.त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या घरच्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ऋषिकेश कानवटे यांनी ई-मेल द्वारे केली आहे.

See also  विजय डाकले यांनी केला नऊ रिक्षा चालकांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ, त्यांना "रिक्षा" हे चिन्ह मिळाले आहे