संगमवाडी येथील तुंबनाऱ्या पाण्याचा निचरा करून रस्ते दुरुस्ती करण्याचे मनसेची मागणी

पुणे : संगमवाडी गावाच्या मुख्य प्रवेशद्वार येथे अर्धा तास जरी पाऊस झाला तरी गुडघाभर पाणी साठते. त्याठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. सदर ठिकाणी रस्त्याचा भाग हा खोलगट असल्याने येथे कायमच पाणी साठून राहते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पाण्यामुळे गावात जाताच येत नाही. लहान मुलांचा मोठा अपघात होऊ शकतो. अगदी खेडेगावामध्ये सुद्धा अशी परीस्थिती नाहीये. काही वाहनचालक पाण्यातून जोरात वाहने चालवतात त्यामुळे हे घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडते त्यामुळे येथे अनेक वेळा वाहनचालक व नागरिकांमध्ये भांडणेही झाली आहेत.
तरी आपणास विनंती कि नागरिकांच्या आरोग्याशी व जीवाशी न खेळता हा रस्ता त्वरित दुरुस्त करून घेऊन समतल करावा व पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा. जर येत्या ४८ तासामध्ये रस्ता दुरुस्त झाला नाही व पाण्याचा निचरा न झाल्यास होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल व मनसे स्टाईल खळ्खट्याक आंदोलन केले जाईल अशाप्रकारचे निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त, शिवाजीनगर-घोलेरोड़ क्षेत्रीय कार्यालय यांना देण्यात आले.

यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष गोकुळ अडागळे, संजय तोडमल, शाखाध्यक्ष मिलन भोरडे, आकाश धेंडे, उपशाखाध्यक्ष ओंकार सोरटे, गोकुळ पवार, विकास मोहिते मनसैनिक अभिजित ताठे, किशोर इंगवले हे उपस्थित होते.    
                                

See also  महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस