बाणेर मध्ये पंतप्रधान मोदींच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त महिलांसाठी स्वयंरोजगाराचा आगळावेगळा उपक्रम

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाचे औचित्य साधून सौ. हर्षदा थिटे यांनी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करून पंतप्रधान मोदींना मानवंदना दिली.महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेला महिलांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेनंतर महिलांनी त्वरित 1000 ते 1200 कंदील बनविण्याच्या ऑर्डर्स स्वीकारल्या. त्यामुळे महिलांना ऐन दिवाळीच्या तोंडावर रोजगाराची आणि पैसे कमविण्याची संधी उपलब्ध झाली.

या कार्यशाळेत लघुउद्योजिका सौ. चैताली यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभचिंतन व्यक्त केले.
सौ. थिटे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

See also  वाचन संस्कृती, विचार आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सव उपयुक्त - देवेंद्र फडणवीस