फुलोरा फाउंडेशन तर्फे तीन लॅपटॉप औंध परिसरातील शाळांना भेट

औंध : फुलोरा फाउंडेशन तर्फे औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल,  गोळवलकर गुरुजी इंग्रजी माध्यम शाळा तसेच खडकी शिक्षण संस्थेतील आलेगावकर माध्यमिक शाळेला लॅपटॉप देण्यात आले.

या शाळांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यासाठी लॅपटॉप्सची गरज आहे अशी विनंती फुलोरा फाउंडेशन कडे करण्यात आली होती. फुलोरा फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. प्रिती शिरोडे यांनी आपला स्वतःचा लॅपटॉप सर्वप्रथम इंदिरा गांधी शाळेला दिला आणि त्यानंतर भोसरी येथील BHTC India या कंपनीला दोन लॅपटॉप्स देण्याची विनंती केली आणि त्यांच्या व्यवस्थापनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन  लॅपटॉप्स फुलोरा फाउंडेशन कडे सुपुर्द केले. फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. प्रिती शिरोडे आणि संचालक श्री. देवराज लिगाडे यांनी हे लॅपटॉप्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले. श्री. देवराज लिगाडे यांनी या तिन्ही लॅपटॉप्स मधे आवश्यक ते सॉफ्टवेअर दिले. 

इंदिरा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता ठाणगे, गोळवलकर गुरुजी इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुतार सर आणि आलेगावकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. घाडगे सर यांनी फुलोरा फाउंडेशनचे आभार मानले. खडकी शिक्षण संस्थेतील जी. एम. आय. कन्या शाळेने देखील विद्यार्थीनींना बसण्यासाठी तीन मोठ्या सतरंज्यांची मागणी फुलोरा फाउंडेशन कडे केली होती आणि तीदेखील दोन दिवसांत पूर्ण झाली याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चपटे मॅडम यांनी फुलोरा फाउंडेशनचे आभार मानले. फुलोरा फाउंडेशनने या तिन्ही शाळांना जून महिन्यात शैक्षणिक साहित्य दिले होते. यंदा फाउंडेशनने एक हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले अशी माहिती फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. प्रिती शिरोडे यांनी दिली. या कार्यक्रमांना या शाळांचे शिक्षक उपस्थित होते. तसेच खडकी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मेहता आणि संचालक श्री. अवस्थी देखील उपस्थित होते.

See also  सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढणार -अमोल बालवडकर   मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार