सुतारवाडी पाषाण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी भगवा ध्वजारोहण

पाषाण : घटस्थापनेच्या दिवशी भगवा ध्वजारोहण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रभाग 9 बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी मध्ये आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार केला.

सुतारवाडी पाषाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घटस्थापने निमित्त देवीची स्थापना व भगवा ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विभाग प्रमुख संतोष तोंडे,विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे,विभाग संघटक संजय निम्हण, रूपालीताई सुतार , अशोक दळवी, सुनीताताई रानवडे शाखा संघटिका,अमित राऊत ,अभिजीत चौगुले शाखाप्रमुख,अमोल फाले शाखाप्रमुख, सुतारवाडी पाषाण  गावचे पोलीस पाटील उमेश गुजर ,गणेश मोरे मराठा सेवक, अनिल नलावडे, ऋषिकेश आप्पा भगत मित्रपरिवार तसेच सुतारवाडीतील तरुण वर्ग व महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन महेश भिमराव सुतार शिवदूत कोथरूड विधानसभा यांनी केले होते.

See also  यश्विन 2.0 सोसायटी सुस येथे "राईट टू वोट" जनजागृती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे गणेशोत्सवानिमित्त आयोजन