परीहार चौक औंध ते आंबेडकर चौक रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृत बांधकाम व शेडवर कारवाई

औंध : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागामार्फत परिहार चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दुतर्फा रस्ते इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून फ्रंट मार्जिन,साईड मार्जिन तसेच अनधिकृतपणे उभारलेले कच्चे बांधकाम, हॉटेल, दुकाने,कच्चे पक्के शेड जवळपास ६० अनधिकृत शेड वर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

संयुक्त कारवाई साठी बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंता श्रीमती कामिनी घोलप , सहायक कोकरे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलिस कर्मचारी,बिगारी सेवक ,औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक श्री.राहुल बोकन,सहायक अतिक्रमण निरीक्षक श्री.वैभव जगताप,राहुल डोके, हाशम पटेल, पंकज आवाड यांच्या धडक कारवाई पथकाने कारवाई केली. तसेच कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय व घोलेरोड शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागाची मदत झाली.०३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

यामध्ये तंबू,लोखंडी जाळ्या,फ्रिज,काउंटर,स्टॉल, इतर साहित्य जप्त करण्यात आले.सुमारे ९,५०० चौरस फूट क्षेत्र  रिकामे करण्यात आले.अतिक्रमण निर्मूलन विभाग उपआयुक्त श्री.संदीप खलाटे, महापालिका सहायक आयुक्त श्री.गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार  व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक श्री. बोकन यांनी सांगितले

See also  पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी हडपसर येथे जनजागृती अभियान