औंध : औंधगावची हजरत सय्यद लालशावली दर्गा ट्रस्ट कमिटी यांचा उर्से(उरुस) शरीफ उत्साहात साजरा. दर्गा ट्रस्ट चे अध्यक्ष श्रावणकुमार लालसिंह राजपुत व मनिष राजपुत असून
औंध गावातून मिरवणूक काढण्यात आली. नंतर आम लंगर(जेवणाचा) भाविकांनी स्वाद घेऊन ‘कव्वाली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या उर्से कार्यक्रमास आमदार बापू पठारे, माजी आमदार वैराट,माजी उपमहापौर वाडेकर, औंधगाव विश्वस्त,माजी नगरसेवक बाबू वागस्कर, दत्ता गायकवाड, कैलास गायकवाड, सनी निम्हण, वसंत जुनवणे, निलेश जुनवणे, ट्रस्टचे संतोक पाल, मकसूद खान, शकूर खान, गणी खान, दिनेश कांबळे, सौरभ कुंडलिक, प्रसाद शिंदे, हमीद सय्यद, रईस सय्यद,हर्षद हांडे, सिराज शेख तसेच औंध गावातील सर्व भाविक उपस्थित होते.