बाणेर येथील औरेलिया हाउसिंग सोसायटी मध्ये श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

बाणेर : बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोड वरील औरेलिया हौसिंग सोसायटी मध्ये श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा अतिशय उत्साहात पार् पडला.

आठवडा भर आधी पासून अक्षता पूजन करून दररोज रामरक्षा, मारुती स्तोत्र , रामस्तुती, हनुमान चालीसा ,रामाची आरती आणि रामायणातिल् गोष्टी सांगणे, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले, जिथे लहान मोठ्या सर्वांचा सहभाग लक्षणीय होता. श्रीराम प्रतिष्ठापने च्या दिवशी संध्याकाळी सगळ्या लहानमुलानि रामायणातील विविध पात्रे साकारली तर मोठ्यानी पारंपरिक वेशभूषेत राम आयेंगे असे गीत रामायण म्हणत मिरवणूक काढली. त्यादिवशी स्वामिनि ग्रुप् ची बहारदार भजन संध्या आयोजित करून त्यामध्ये औरेलिया तील उत्साही मुलांनी डान्स सादर करून सगळ्यांची वाहवा मिळवली. या पूर्ण आठवड्यात सोसायटी सजवून रहिवाशानी दिवे लावून आणी रांगोळ्या काढून त्यांचा उत्साही सहभाग नोंदविला. असा हा अविस्मरणीय श्री राम जन्मभूमी मूर्ती प्रतिष्ठापनेचा अविस्मरणीय् समृद्ध क्षण सर्वांच्या आयुष्यात आला आणी तोऔरेलिया वासियांनी आनंदाने उत्साहाने जपण्याचा प्रयत्न केला. या मध्ये सोसायटी चे चेअरमन श्री संतोष अनासपुरे, सेक्रेटरी श्री अमेय फडके आणी सगळ्या कंमिटी मेबर्स व सर्व सिनिअर सिटीझन्स चे खूप सहकार्य लाभले.

See also  अदानी प्रकरणी काँग्रेसने जेपीसीच्या केलेल्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा - रेखा ठाकूर