बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित “Run for Better Tomorrow of Prabhag 9 – परिवर्तन रन मॅरेथॉन” हा उपक्रम रविवारी, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी बाणेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण, सुस आणि महाळुंगे या परिसरातील सुमारे 4 हजार हून अधिक नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पर्धेचे आयोजक आणि कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे हे कोणत्याही परिस्थितीत प्रभाग क्र 9 चे उमेदवार असतील, अशी घोषणा करतच स्पर्धेला राजकीय रंगही भरले.
माऊली पेट्रोल पंप ग्राउंड, बाणेर येथून पहाटे ५.३० वाजता मॅरेथॉनची सुरुवात झाली. नागरिक, ज्येष्ठ धावपटू, तरुणाई, महिला, विद्यार्थी अशा सर्व स्तरांतील लोकांनी धावण्याचा उत्साह अनुभवला. परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक परिवर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
मॅरेथॉननंतर सहभागींसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये ५ भाग्यवान विजेत्यांना सायकल भेट देण्यात आल्या. तसेच कार्यक्रमात विविध आकर्षक बक्षिसे, मेडल्स आणि प्रशस्तीपत्रक देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला.नागरिकांसाठी हा उपक्रम एक उत्साही आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
कार्यक्रमाबद्दल बोलताना जयेश संजय मुरकुटे यांनी सांगितले की,
“प्रभाग ९ मध्ये आरोग्यदायी व सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा परिवर्तन रन चा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद हा आम्हाला पुढील उपक्रमांसाठी मोठी प्रेरणा देणारा आहे. या मॅरेथॉनमुळे तरुणांना फिटनेसची प्रेरणा मिळेल आणि समाजात एकोपा वाढेल.”
कार्यक्रमात ब्लू ब्रिगेड, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचे स्वयंसेवक, स्थानिक संस्था आणि नागरिक यांनी उत्कटतेने सहकार्य केले. धावपटूंसाठी सुरक्षा, पाणी व्यवस्था, प्राथमिक उपचार, मार्गदर्शन आणि छायाचित्रणाची उत्तम सोय करण्यात आली होती.
या स्पर्धेवेळी प्रशांत दादा जगताप, अशोक बापू मुरकुटे, रंजना अशोक मुरकुटे, संजय मुरकुटे, प्रमिला संजय मुरकुटे, संदीप बालवडकर, विनायक गायकवाड, पंकज खताने, महेश शिवशरण यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘परिवर्तन रन मॅरेथॉन’ने प्रभाग ९ मध्ये आरोग्यदायी, सक्रिय आणि जागरूक समाज घडविण्याचा संदेश यशस्वीपणे दिला.
























