कोथरूड : भंडारा जिल्ह्यात प्रचारा दरम्यान भाजप पदाधिकार्यां मार्फत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपची टोपी आणि गमछा घालून अवमान करण्यात आला, व सातत्याने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत आहे.याच्या निषेधार्थ कोथरूड विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, कोथरूड गावठाण, कोथरूड येथे तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अभयजी छाजेड, प्रदेश युवक कॉंग्रेस सोशल मिडीया अध्यक्ष अक्षयदादा जैन, पुणे युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष सौरभदादा आमराळे, प्रशांत वेलनकर, अमोल काळे, हर्षल हांडे, यश कोलते, अथर्व गाढवे, निहाल शेख, हिमांशु इंगोले, कुंदाताई विभुते, सागर नेरे, गणेश रेड्डी, संकल्प कोंडेकर, मंथन सपकाळ,विकास काटे, हर्षल वाघमारे, तुषार पठारे, गणेश मांडके, साहिल दळवी, आयोजक युवक कॉंग्रेस अध्यक्ष कोथरूड विधानसभा राज गोविंद जाधव व आदी पदाधिकारी उपस्थित होते.























