मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन ते आरबीआय गणेशखिंड रस्ता या मार्गावरील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील राजभवन औंध ते सिमला ऑफिस कडे जाणारा उड्डाणपूलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. परंतु नेतेमंडळींची उद्घाटन साठी वेळ मिळत नाही . नागरिकांची गैरसोय होत आहे पण शासनाला त्याचे महत्व नाही.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करून जर लवकर पूल सुरू नाही केला तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे उद्घाटन नागरिकांसाठी तातडीने करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आले होती.

अखेर मनसेचे आंदोलन तसेच विविध राजकीय पक्षांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार विद्यापीठ चौकातील पहिल्या टप्प्यातील उड्डाणपुलाचे उद्घाटन 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी मदत होणार आहे.

पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असताना उद्घाटनांसाठी पूल व रस्ते अडवून ठेवण्यात येऊ नये अशी मागणी देखील या निमित्ताने केली जात आहे.

See also  वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ - आमदार हेमंत रासने