पाषाण तलाव, आयटीआय ग्राउंड व सुतारवाडी जलतरण तलाव विकासासाठी नगरसेविका मयुरी कोकाटे यांचा पुढाकार

पुणे : पाषाण परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाषाण तलाव, आयटीआय ग्राउंड व सुतारवाडी येथील जलतरण तलावाच्या विकासासाठी नगरसेविका मयुरीताई कोकाटे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात नगरसेविका मयुरीताई कोकाटे व राहुल दादा कोकाटे यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या.

पाषाण तलावाचा त्वरित डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात यावा, सुतारवाडी येथील जलतरण तलावाची तातडीने दुरुस्ती करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा तसेच आयटीआय ग्राउंड खेळाडूंसाठी योग्य पद्धतीने विकसित करण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी या भेटीत केल्या.

या मागण्यांची दखल घेत माननीय आयुक्त नवल किशोर राम यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत सादर केलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे पाठवून दिले. त्यामुळे या तिन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांना लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या विकासकामांमुळे पाषाण व सुतारवाडी परिसरातील नागरिकांना तसेच खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

See also  पती - राजीव गांधींच्या देशाप्रती उद्दीष्टांना व ऊत्तरदायीत्वांना वाहुन घेणाऱ्या सोनिया गांधीचे जीवन आदर्श पतिव्रतेचे असून नेहरू गांधी कुटुंबियां विषयी दुस्वासाने आरडाओरड करणारे उथळ...! - वीर माता कविता गाडगीळ यांचे प्रतिपादन