पाषाण : गेल्या 21 वर्षापासून रखडलेल्या पाषाण-बाणेर 36 मीटर रोडच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचवेळी नगरसेविका मयुरीताई कोकाटे यांच्या विकास निधीमधून प्रभाग क्रमांक 9 पाषाण, सुतारवाडी,बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी परिसरातील नऊ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ही भूमिपूजन करण्यात आले.
पुण्यनगरीचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधरमोहोळ व नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 70 कोटी रुपये भूसंपादनासाठी पुणे मनपा ने अदा केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी व नगरसेविका मयुरी कोकाटे या सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर आज या रखडलेल्या बाणेर पाषाण लिंक रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त केले. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊ मधील गेल्या चार-पाच वर्षातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याच्या उद्देशाने नगरसेविका मयुरी ताई कोकाटे यांनी त्यांच्या विकास निधी मधून प्रभागात नऊ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजनही केले, या निधीमधून रस्ते असेल, ड्रेनेज व्यवस्थापन असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील, परिसरातील बुद्ध विहार असतील, फुटपात असतील, स्ट्रीट लाईट असतील,खेळाची मैदाने अशा विविध कामांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या नाल्यांच्या संरक्षक भिंती असतील, पावसाळी पाण्याच्या लाईन असतील, स्वच्छतागृहे असतील, प्रभागातील सर्व स्मशानभूमीतील विकास कामे असतील या सर्व कामांसाठी हा नऊ कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे, अशी माहिती नगरसेविका मयुरी कोकाटे यांनी दिली.
त्याचबरोबर सुतारवाडी मुख्य रस्ता, सुसगाव व म्हाळुंगे गाव मुख्य रस्ता, सुसखिंडीतील ग्रेट सेपरेटर व हायवे लगतचे सर्विस रोड या सर्वांचे कामे लवकरच मार्गी लागली जातील असे भाजप नेते राहुलजी कोकाटे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ला भाजप नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, उत्तर कोथरूड मतदार संघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, उमा गाडगीळ,वैदही बापट, प्रवीण आमले, मोरेश्वर बालवडकर, अनिकेत चांदेरे,रोहन कोकाटे उपस्थित होते. तसेच शिवकुमार गोयल,प्रशांत खिंवसरा,विनोद दीक्षित, पुष्कर कुलकर्णी, मनीष मिश्रा, तपस कुमार, अरुण वराडे, रत्नाकर मानकर, हरीश पवार, संजीवनी आवटी, सारिका पत्की यांसारखे विविध सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी ही उपस्थित होते.
















