पुणे, दि. १५ जून : केंद्रातील पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १२ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार Murlidhar Mohol यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि देशाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ यांनी गेल्या १२ वर्षांत भारताने पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, परराष्ट्र धोरण, सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकास या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली असून देश जागतिक स्तरावर अधिक सक्षम आणि प्रभावी बनल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि पायाभूत सुविधा विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेने जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळविल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे शहर आणि परिसरातील विकासकामांबाबत बोलताना मोहोळ यांनी मेट्रो प्रकल्प, विमानतळ विकास, रस्ते आणि वाहतूक सुविधांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आगामी काळातही पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा जनतेपर्यंत व्यापक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
















