मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे निर्देश

पुणे, दि. १६ जून २०२६ : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, नाले सफाई, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाच्या विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी सुरू असलेल्या कामांची माहिती सादर केली.

यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत पावसाळ्यादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व विभागांनी आवश्यक दक्षता घेण्याचे आदेश दिले.

बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

See also  कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू करण्याचा आप चा आग्रह अन्यथा आंदोलनाचा इशारा