नगरसेविका मयुरी कोकाटे यांच्या पुढाकाराने प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

पाषाण : प्रभागातील नागरिकांना दर्जेदार व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरसेविका मयुरीताई राहुल कोकाटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, या कामांचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला.

हा भूमिपूजन सोहळा केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या वेळी मुरलीधर निम्हण, विजय कुलकर्णी, चंद्रकांत कडू, शाम जगताप, अभिजित कदम, मयूर बाणेकर, ऋषिकेश आर्या, जयंत इंदुलकर, नीलिमा काळे, सविता जाधव, संभाजीराव वाघमारे, तुकाराम आरगडे, कुसुम शिंदे, पोपट सावंत, सुधाकर काळे, चंद्रकांत जाधव, नवनाथ ववले, उत्तम जाधव, विराज कोकाटे, नंदकुमार जाधव, शरद पाषाणकर, रघुनाथ उत्पात, रामभाऊ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये सुस रोडवरील समर्थ कॉलनी येथे गल्ली ब्लॉक बसविणे, पाषाण येथील स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन दुरुस्ती तसेच सोमेश्वर वाडीतील संध्यानगर येथे ड्रेनेज लाईनचे काम व रस्ता डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.

यावेळी नगरसेविका मयुरीताई राहुल कोकाटे यांनी सांगितले की, नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, या विकासकामांमुळे रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर मूलभूत नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.

यावेळी “विकासाचा ध्यास… नागरिकांचा विश्वास!” हे ब्रीदवाक्य अधोरेखित करत राहुलदादा कोकाटे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशीच विकासकामे सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

See also  बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन