पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रामोशी गेट येथील श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला येथे भव्य जयंती महोत्सव उत्साहात पार पडला. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सुप्रसिद्ध चंदन कांबळे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
नगरसेवक विवेक महादेव यादव यांच्या वतीने आयोजित या जयंती महोत्सवाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक निलेश आल्हट, नगरसेविका मृणालिनी कांबळे, महेश सकट, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, संतोष यादव संदीप धांडोरे, राज पुरोहित, संदीप लडकत, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, बंडूजी यादव, चरणमोहन यादव, महेश चंदन, सुधीर जानजोत, राजेंद्र काकडे, देवेंद्र वडके सोनुभाऊ निकाळजे, अविनाश मोरे, शंशाक माने, अमित मते, रोहित ओझरक, नितीन भुरेवार, सुरज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. “गिरणी कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी अण्णाभाऊ साठे खंबीरपणे उभे राहिले,” असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात गायक चंदन कांबळे यांनी “येडाई माझा जीव गं जीव” यासह अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी परंपरेतील गीते सादर केली. तसेच “महाराष्ट्राच्या मातीत गाजतंय अण्णाभाऊचं नाव”, “आला आला सांगावा फडकतो भगवा”, “माझा लहुजी सरदार”, “जा जगाला सांग बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर” यांसारख्या गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. अजय क्षीरसागर, ज्ञानेश्वरी कांबळे आणि इतर कलाकारांनीही आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
















