समता पर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

पुणे : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन केले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून २५८ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासोबतच संविधान उद्देशिकेचेही वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी दिली.

See also  नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टीक स्पर्धेत पुण्याच्या साहिल मरगजे व सौख्या शेटे ची नेत्रदिपक कामगिरी सौख्या ला कांस्य तर साहिल सिल्व्हर पदकाचे मानकरी