पुणे : प्रभाग क्र. ८ औंध-बोपोडी परिसरात नगरसेविका भक्तीताई अजित गायकवाड, पुणे महानगरपालिका व द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत सुभाषदादा गायकवाड यांच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट असे ५ दिवस द औंध सोशल फाउंडेशन कार्यालय येथे सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत सुरू राहणार आहे.
शिबिराच्या पहिल्या दिवशीच जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोंदणी करून घेतली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पीएमपीएमएल बस, मेट्रो व इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त असलेले हे NCMC (National Common Mobility Card) – वन नेशन वन कार्ड नागरिकांना एकाच कार्डवर प्रवासाची सुविधा देते.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भक्तीताई गायकवाड व अभिजीत गायकवाड यांनी केले आहे.
















